दीपिका पदुकोणचे ‘हे’ फ्लॉप चित्रपट माहितीयेत का?

By Harshada Bhirvandekar
Jun 13, 2024

Hindustan Times
Marathi

सर्वाधिक मानधन घेणारी आणि टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक दीपिका पदुकोण लवकरच ‘कल्की २८९८एडी’ या चित्रपटात दिसणार आहे.  

तिने तिच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. पण, आज आपण तिच्या फ्लॉप चित्रपटांबद्दल बोलणार आहोत.  

‘चांदनी चौक टू चायना’ या चित्रपटात दीपिका पदुकोणने अक्षय कुमार सोबत दुहेरी भूमिकेत काम केले होते. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही.  

‘कार्तिक कॉलिंग कार्तिक’ या चित्रपटात फरहान अख्तर आणि दीपिका पदुकोण झळकले होते. हा एक सायकॉलॉजिकल थ्रिलर चित्रपट होता, जो लोकांना फारसा समजलाच नाही आणि फ्लॉप ठरला.  

‘ब्रेक के बाद’ या चित्रपटात दीपिकाने इमरान खान सोबत काम केले. हा रोमान्स कॉमेडी चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही.  

अभिषेक बच्चन आणि दीपिका पदुकोण स्टारर चित्रपट ‘खेले हम जी जान से’ हा अभिनेत्रीच्या कारकिर्दीतील फ्लॉप चित्रपटांपैकी एक आहे.  

प्रकाश झा यांच्या ‘आरक्षण’ या चित्रपटात अनेक स्टार होते. या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. पण हा चित्रपट शेवटी फ्लॉप ठरला.  

दीपिका पदुकोण अर्जुन कपूर सोबत ‘फाइंडिंग फनी’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटातील कथा हरवलेल्या प्रेमाचा शोध घेणारी होती, जी फ्लॉप ठरली.  

‘८३’ हा चित्रपट माजी क्रिकेटर कपिल देव यांचा बायोपिक होता यामध्ये दीपिकाची छोटीशी भूमिका होती मात्र हा चित्रपटही फ्लॉप ठरला.  

‘झिरो’ या चित्रपटात कतरिना कैफ, अनुष्का शर्मा आणि शाहरुख खान यांच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटात दीपिकाने ‘कॅमिओ’ केला होता, पण हा चित्रपट फ्लॉप ठरला.

स्वयंपाक घराशी संबंधित दोष दूर करतील ‘हे’ सोपे उपाय!