घरात गंगाजल ठेवलंय? मग करू नका ‘या’ चुका!

By Harshada Bhirvandekar
Jun 20, 2024

Hindustan Times
Marathi

सनातन धर्मात गंगा नदीला मातेचा दर्जा देण्यात आला आहे. यामुळे गंगेचे पाणी अत्यंत पवित्र मानले जाते.

अनेक भाविक घराला शुद्ध ठेवण्यासाठी घरात गंगाजल ठेवतात. गंगेचे पाणी मोक्ष प्रदान करते, असे म्हणतात.

गंगाजलाशिवाय घरातील कोणतेही धार्मिक कार्य पूर्ण होत नाही. पण, गंगाजल घरात ठेवताना काही नियम पाळावेत.

गंगाजल कधीही घरात अंधार असलेल्या ठिकाणी ठेवू नये.

गंगाजल हे अतिशय पवित्र आहे. त्यामुळे गंगाजल नेहमी स्वच्छ ठिकाणी ठेवावे.

ज्या दिवशी तुम्ही मांसाहार किंवा मद्यपान केले असेल, तेव्हा गंगाजलाला स्पर्श करू नका.

ज्या खोलीत तुम्ही मद्य किंवा मांसाहार करता, त्या खोलीत गंगाजल ठेवू नका, त्यामुळे ग्रहदोष निर्माण होतो.

गंगाजल नेहमी देवघराच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवावे. धार्मिक कार्यासाठी ही दिशा उत्तम मानली जाते.

प्लास्टिकच्या बाटलीत किंवा कॅनमध्ये गंगाजल ठेवू नये. त्याऐवजी तांबे, पितळ किंवा चांदीच्या भांड्यात ठेवावे.

स्वयंपाक घराशी संबंधित दोष दूर करतील ‘हे’ सोपे उपाय!