महिलांना पुरुषांपेक्षा जास्त तासांची झोप आवश्यक असते? 

pixa bay

By Tejashree Tanaji Gaikwad
Mar 20, 2024

Hindustan Times
Marathi

महिला अनेकदा त्यांच्या दैनंदिन जीवनात अनेक जबाबदाऱ्या पेलत असतात. त्यामुळे जेव्हा त्यांना पुरेशी विश्रांती मिळत नाही तेव्हा त्याचा त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो.

pixa bay

संशोधनात असे दिसून आले आहे की महिलांना त्यांचे आरोग्य राखण्यासाठी पुरुषांपेक्षा जास्त तासांची झोप लागते.

pixa bay

निद्रानाश पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये अधिक सामान्य आहे, विशेषत: विशिष्ट वयानंतर रजोनिवृत्तीनंतर होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे. रजोनिवृत्तीनंतर स्त्रीच्या शरीरात इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनचे उत्पादन कमी झाल्याने झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. झोपेच्या कमतरतेमुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात जसे की हृदयरोग, टाइप २ मधुमेह, नैराश्य आणि मूड विकार.

pixa bay

साधारणपणे तरुण स्त्रियांनी रात्री ७-९ तास झोपेचे लक्ष्य ठेवण्याची शिफारस केली जाते. तथापि, हे ओळखणे महत्त्वाचे आहे की वैयक्तिक झोपेची गरज विविध कारणांमुळे बदलते. म्हणूनच, महिलांनी त्यांच्या शरीराशी जुळवून घेणे आणि शांत झोपेला प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे, असे तज्ञ म्हणतात..

pixa bay

झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठी काही टिप्स 

pixa bay

झोपायला जाण्याचा प्रयत्न करा आणि दररोज सेम वेळी उठा. हे तुमच्या शरीराच्या अंतर्गत घड्याळाचे नियमन करण्यात मदत करेल आणि झोपेच्या चांगल्या गुणवत्तेला प्रोत्साहन देईल.

pixa bay

उबदार आंघोळ किंवा मेडिटेशन यांसारख्या शांत अ‍ॅक्टिव्हिटीमध्ये गुंतून राहा. 

pixa bay

झोपायच्या आधी कॅफिनचे सेवन करणे आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरणे टाळा कारण यामुळे झोपेचा त्रास होऊ शकतो.

pixa bay

आरामदायी पलंग वापरून, खोलीतील तापमान तुमच्या आवडीनुसार सेट करून आणि झोपेच्या चांगल्या गुणवत्तेला प्रोत्साहन देऊ शकता. 

pixa bay

झोपेच्या आधी आराम करण्यास मदत करण्यासाठी डीप  श्वास, माइंडफुलनेस मेडिटेशन किंवा उबदार आंघोळ यासारख्या तणाव-कमी तंत्रांचा सराव करा.

pixa bay

आज या ५ राशींसाठी पैशांचा दिवस