ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून करा ‘हे’ काम; व्हाल मालामाल!
By
Harshada Bhirvandekar
Jun 19, 2024
Hindustan Times
Marathi
हिंदू धर्मात ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. ज्येष्ठ पौर्णिमेची तिथी ही सर्वात शुभ तिथी मानली जाते.
या तिथीला भगवान चंद्र आपल्या १६व्या कलेमध्ये असतात. त्यांचे किरण पृथ्वीवर समृद्धी आणि सौभाग्य प्रदान करतात.
यावेळेस ही पौर्णिमा २१ जून २०२४ रोजी सकाळी ६.०१ वाजता सुरू होईल आणि २२ जून रोजी सकाळी ५.०७ वाजता संपेल.
या दरम्यान, शुक्रवार २१ जून रोजी व्रत पाळले जाणार आहे. तर, २२ जून रोजी स्नान आणि दान करून व्रत पूर्ण करता येईल.
पिंपळाच्या झाडावर भगवान विष्णूसोबत माता लक्ष्मीचा वास असल्याचे मानले जाते.
ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी एका भांड्यात पाणी घेऊन त्यात कच्चे दूध आणि बताशा टाकून पिंपळाच्या झाडाला अर्पण करावे.
या दिवशी चंद्राची पूजा करावी.दुधात मध आणि चंदन मिसळून चंद्राला अर्पण करावे. यामुळे मनोकामना पूर्ण होतील.
ज्येष्ठ पौर्णिमेला १.२५ किलो तांदूळ लाल रंगाच्या कपड्यात बांधून आपल्या तिजोरीत ठेवावे. यामुळे गरिबी दूर होते.
ज्यांच्या कुंडलीत चंद्रदोष आहे, त्यांनी या दिवशी गंगाजलात दूध मिसळून शिवलिंगाला अर्पण करावे.
उफ्फ तेरी अदा! दिशा पटाणीच्या फोटोंची चर्चा
पुढील स्टोरी क्लिक करा