घरात पैसा टिकत नसेल तर हे उपाय करा

By Rohit Bibhishan Jetnavare
Apr 05, 2024

Hindustan Times
Marathi

खूप कष्ट करूनही अनेकांच्या घरात पैसा टिकत नाही. घरात पैसा येतो आणि जातो. 

जर तुमच्यासोबतही असे घडत असेल आणि खूप प्रयत्न करूनही घरात पैसा टिकत नसेल, तर त्याचे एक कारण वास्तुदोष हेही असू शकते.

हे दोष दूर करण्यासाठी वास्तू शास्त्रात काही उपाय सांगितले आहेत, ते केल्याने शुभ लाभ मिळतात.

वास्तूनुसार व्यापार वृद्धी यंत्र, महालक्ष्मी यंत्र, बिसा यंत्र यांसारखे शुभ यंत्र तिजोरीत ठेवणे शुभ असते. यामुळे तिजोरी कधीच रिकामी होत नाही.

घराची आर्थिक परिस्थिती खराब असेल तर वास्तू दोष दूर करण्यासाठी रामचरितमानस आणि सुंदरकांडचा नियमित पाठ करावा. 

घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी मुख्य दारावर दिवा लावा, यामुळे वास्तुदोषही दूर होतात. असे केल्याने घरात लक्ष्मीचा वास राहतो.

भगवान शंकराला बेलपत्र अर्पण करणे चांगले मानले जाते. यामुळे आर्थिक समस्या दूर होऊ शकतात.

मुख्य दरवाजावर सूर्यदेव यंत्र बसवणे शुभ असते. वास्तुशास्त्रानुसार मुख्य दरवाजावर लावल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते.

शुक्रवारी अष्ट लक्ष्मी म्हणजेच लक्ष्मीच्या ८ रूपांची पूजा करा. ही पूजा रात्री करा. ही पूजा सूर्यास्तानंतर कधीही करू शकता. 

या सोबतच लक्ष्मीच्या प्रिय श्रीयंत्राचीही पूजा करावी. श्रीयंत्राची पूजा करताना त्यात बनवलेल्या प्रत्येक कोनाकडे पाहा. यामुळे आर्थिक संकटे टळतात.

‘बिब्बोजान’च्या कातील अदा करतील तुम्हालाही फिदा!