यावेळी जेष्ठ महिन्याच्या प्रदोष व्रताच्या दिवशी विशेष योग घडत आहे. मासिक शिवरात्री आणि प्रदोष व्रत दोन्हीही मंगळवार ४ जून रोजी एकत्रच येत आहे.
मंगळवारी येणाऱ्या प्रदोष व्रताला भौमप्रदोष व्रत म्हटले जाते. याशिवाय हा दिवस जेष्ठ महिन्यातील मोठा मंगळवार आहे.
हा दिवस अतिशय शुभ असल्याने रुद्र अवतार म्हटल्या जाणाऱ्या हनुमानजींची पूजा केल्याने भक्तांच्या प्रत्येक मनोकामना पूर्ण होतील.
भौम प्रदोषाच्या दिवशी भगवान शंकरांसोबत हनुमानजींच्या पूजेला ही विशेष महत्त्व आहे.
ज्या लोकांच्या कुंडलीत मंगळ दोष आहे किंवा त्यांच्या वैवाहिक जीवनात अडथळे येत आहेत, त्यांच्यासाठी ही पूजा करणे खूप शुभ आहे.
भौम प्रदोष व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून, लाल रंगाचे वस्त्र परिधान करावे.
संध्याकाळी प्रदोष काळात पुन्हा स्नान करून, कपडे बदलावेत. भगवान शिवाचा अभिषेक करावा आणि विधीनुसार प्रदोषाची पूजा करावी.
भगवान शिवाला दूध, दही, तूप, गंगाजल आणि मधापासून बनवलेल्या पंचामृताने शिवाचा अभिषेक करावा. त्यानंतर बेलपत्र, भांग, धोत्रा, अक्षत, फळे व फुले अर्पण करावी.
पूजेनंतर शिव चालीसा पठण करून, आरती करून भगवान शिवाला दुधाची पांढऱ्या रंगाची बर्फी अर्पण करावी.
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान