रोज सकाळी करा ‘ही’ ५ कामं; दूर होतील आर्थिक समस्या!

By Harshada Bhirvandekar
Jul 01, 2024

Hindustan Times
Marathi

अनेक वेळा कष्ट करूनही माणसाला जीवनात पैशाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते. 

घरातील नकारात्मक उर्जेचाही जीवनावर परिणाम होऊ शकतो. यामुळेही आर्थिक समस्या निर्माण होतात.

बऱ्याच वेळा आपण जाणूनबुजून किंवा नकळत काही चुका करतो, ज्यामुळे नकारात्मक उर्जेचा प्रसार वाढतो.

वास्तुविद्यामध्ये असे काही उपाय सांगण्यात आले आहेत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या घरातील सकारात्मक ऊर्जा कमी करू शकता. 

भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळवण्यासाठी दर गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा करावी. यामुळे आर्थिक समस्या सुटू शकतात.

पाण्यामध्ये मीठ मिसळून पुसल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते.

दररोज सकाळी घरात दिवा लावा, जेणेकरून घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकेल.

दररोज तुळशीला जल अर्पण करा आणि सकाळ-संध्याकाळ तिच्यासमोर तुपाचा दिवा लावा.

सूर्याला रोज अर्घ्य दिल्याने कुंडलीत सूर्य ग्रह बलवान होऊ शकतो. हा ग्रह मान आणि पदाशी संबंधित मानला जातो.

किम कार्दशियन मुंबईत आली अन् ऑटो रिक्षाच्या प्रेमात पडली!