महादेवाला प्रसन्न करण्यासाठी करा हे ५ सोपे उपाय

By Priyanka Chetan Mali
Dec 23, 2024

Hindustan Times
Marathi

हिंदू धर्मात भगवान शंकर अधिक पूजनीय मानले जातात. त्यांना देवाधिदेवाची उपाधी प्राप्त झाली आहे.

स्त्री-पुरुष सर्वच महादेवाची पूजा करतात. महादेवाला प्रसन्न करण्यासाठी वेगवेगळे उपायही केले जातात.

सोमवार हा दिवस महादेवाच्या पूजेसाठी समर्पित आहे आणि या दिवशी केलेल्या पूजेने ते लवकर प्रसन्न होतात, असे सांगितले जाते.

आज सोमवार असून, जाणून घेऊया भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी ५ सोपे उपाय.

मान्यतेनुसार जल, बेलपत्र, भांग, धोत्रा इ. प्रिय वस्तू अर्पण केल्याने महादेव प्रसन्न होतात.

भगवान शंकराला तांदूळाचे ४ दाणेही अर्पण केले, तर ते प्रसन्न होऊन कृपा आशीर्वाद देतात.

भगवान शंकराचा अभिषेक करताना ॐ नमः शिवाय मंत्राचा जप करा. सायं महादेवाच्या मंदिरात तुपाचे ११ दिवे लावा.

असे सांगितले जाते की, महादेवाला एक तांबा पाणी अर्पण केल्यानेही ते प्रसन्न होतात.

सोमवार, मासिक शिवरात्री, प्रदोष व्रत आणि महाशिवरात्री साख्या खास दिवशी शंकराची पूजा आणि व्रत केल्यानेही महादेव प्रसन्न होतात.

डिस्क्लेमर : ही माहिती केवळ धार्मिक श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही.

लहान मुलांसाठी बनवा चॉकलेट चिक्की!