शनि जयंतीला करा ‘हे’ ३ उपाय; दूर होतील सारी दुःख!

By Harshada Bhirvandekar
May 29, 2024

Hindustan Times
Marathi

ज्योतिषशास्त्रात शनि देवाला न्याय आणि कर्माचा फळ देणारे देवता मानले जाते. शनि देवाची पूजा करण्यासाठी शनि जयंती हा सर्वोत्तम दिवस मानला जातो.  

शनी जयंती दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या तिथीला साजरी केली जाते. यंदाची शनि जयंती गुरुवार, ६ जून रोजी येत आहे.  

त्या दिवशी काही उपाय केल्याने तुम्ही शनि देवाचा राग शांत करू शकता, ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळू शकते. जाणून घेऊया या उपायांबद्दल...  

ज्योतिष शास्त्रानुसार, शनि जयंतीच्या दिवशी जर एखाद्या व्यक्तीने कावळ्याला चपाती खाऊ घातली, तर शनिदेव त्याच्यावर प्रसन्न होतात आणि त्याला शुभ आशीर्वाद देतात.  

कावळा हे शनि देवाचे वाहन मानले जाते. त्यामुळे शनि जयंतीच्या दिवशी कावळ्याला अन्न दिल्याने त्यांचा विशेष आशीर्वाद राहतो.  

जर, तुमच्या कुंडलीत राहू किंवा शनीचा दोष असेल, तर शनी जयंतीच्या दिवशी कापूर काळ्या कपड्यात घेऊन घराच्या दारावर लटकवावा.  

आता सूर्यास्तानंतर हा कापूर घेऊन तो जाळा. असे केल्याने तुम्हाला लवकरच फायदे दिसू लागतील.  

ज्योतिष शास्त्रानुसार, शनि जयंतीच्या दिवशी दिव्यात मोहरीचे तेल आणि काही काळे तीळ टाकून दिवा प्रज्वलित करणे शुभ मानले जाते.

निर्जला एकादशीला या राशींचं भाग्य उजळणार