चुकूनही पाकिटात ठेवू नका ‘या’ गोष्टी; कंगाल व्हाल!
By
Harshada Bhirvandekar
Apr 11, 2024
Hindustan Times
Marathi
स्त्रिया असो वा पुरुष दोघेही आपल्या पाकिटात पैशांव्यतिरिक्त अशा अनेक वस्तू ठेवतात, ज्यांची त्यांना गरज नसते.
वास्तुशास्त्रात पर्स आणि पाकिटाबाबत अनेक नियम सांगण्यात आले आहेत, ज्यांचे पालन केल्यास जीवनात अनेक समस्या टाळता येतात.
वास्तुशास्त्रानुसार, अशा काही गोष्टी आहेत ज्या पाकिटामध्ये ठेवू नयेत. चला तर ‘या’ गोष्टींबद्दल जाणून घेऊया...
वास्तुशास्त्रानुसार, पर्समध्ये चावी ठेवणे फारच अशुभ मानले जाते. असे केल्याने तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते.
वास्तूनुसार, पर्समध्ये पूर्वज किंवा देवतांचे फोटो ठेवणे ही चुकीचे आहे. असे केल्याने आर्थिक समस्या उद्भवतात.
हिंदू धर्मात पूर्वजांना देवासमान मानले जाते. म्हणून त्यांचे फोटो पर्समध्ये ठेवणे हा त्यांचा अपमान मानला जातो.
चुकूनही जुनी बिले पर्समध्ये ठेवू नका. असे केल्याने तुमच्या पाकिटातील पैसे कमी होऊ लागतात.
अनेकदा लोक काही औषधे त्यांच्या पर्समध्ये किंवा पाकिटमध्ये ठेवतात, जेणेकरून ते गरजेच्या वेळी घेऊ शकतील.
मात्र, औषध पाकिटात ठेवल्याने नकारात्मक ऊर्जेला चालना मिळते. म्हणून पर्समध्ये औषध ठेवणे टाळावे.
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा