हिंदू धर्मात श्रावण महिना हा भगवान शंकराचा आवडता महिना मानला जातो. लवकरच श्रावण महिना सुरू होणार आहे.
श्रावणाच्या महिन्यात लोक शिवलिंगावर विविध प्रकारच्या वस्तूंचा अभिषेक करतात. पण, काही गोष्टी अशा आहेत ज्या शिवलिंगावर अर्पण केल्या जाऊ शकत नाही.
भगवान शंकराच्या पूजेमध्ये तुळशीच्या वापर निषिद्ध मानला जातो. पौराणिक मान्यतेनुसार भगवान शिवाने तुळशीचा पती जालिंदर या राक्षसाचा वध केला होता.
शिवलिंगाला कधीही हळद लावू नये, असे देखील सांगितले जाते.
शिवपुराणानुसार, केतकी फुलाने ब्रह्माजींच्या खोटेपणाचे समर्थन केले होते. म्हणून भगवान शिवाने केतकी फुलाला शाप दिला की, हे फुल कधीही त्यांच्या पूजेत वापरले जाणार नाही.
शिव आणि शिवलिंगावर कधीही सिंदूर अर्पण करू नये.
शिवलिंगावर कधीही शंखातून जल अर्पण केले जात नाही.
भगवान शंकराच्या पूजे दूध, मध, दही अर्पण केले जाते. परंतु, नारळ किंवा नारळ पाणी अर्पण केले जात नाही.
केतकी व्यतिरिक्त शिवलिंगावर लाल रंगाची फुले, कणेर, कमळ ही फुले अर्पण करणे निषिद्ध मानले जाते.
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान