गणपतीची पूजा करताना करू नका ‘या’ चुका; होईल कोप!
By
Harshada Bhirvandekar
May 20, 2024
Hindustan Times
Marathi
गणपती ही बुद्धी आणि ज्ञानाची देवता आहे. स्वच्छ मनाने आणि भक्ती भावाने गणपतीची उपासना केल्यावर तो लवकर प्रसन्न होतो.
पण यासोबत असंही म्हटलं जातं की, गणपतीच्या पूजेत आपल्याकडून काही चुका झाल्या, तर आपली पूजा मान्य होत नाही.
पौराणिक मान्यतेनुसार, तुळशीचा उपयोग भगवान शिव तसेच, त्यांच पुत्र गणपतीच्या पूजेत केला जात नाही.
असे मानले जाते की, श्रीगणेशाने तुळशीला शाप दिला होता की, तिचा वापर गणपतीच्या पूजेत कधीच होणार नाही.
गणपती आणि चंद्र देव यांचे नाते देखील फारसे चांगले नव्हते. असे म्हणतात की, एकदा चंद्राने गणेशाच्या रूपाची खिल्ली उडवली होती.
यामुळेच गणेशाने चंद्राला शाप दिला होता की, त्याचे सौंदर्य नष्ट होईल आणि गणपतीच्या पूजेवेळी त्याला कुणी पाहणार नाही.
गणपतीच्या पूजेत पिवळे चंदन किंवा पांढऱ्या कपड्याऐवजी पिवळे कापड आणि पिवळा पवित्र धागा वापरावा.
गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र पहाणे शास्त्रात निषिद्ध आहे.
गणपतीच्या पूजेत चुकूनही कणीचा तांदूळ वापरू नये, त्याऐवजी पूर्ण तांदूळ वापरावा
'या' आहेत जगातील सर्वात वेगाने धावणाऱ्या रेल्वे!
पुढील स्टोरी क्लिक करा