नवरात्रीत करू नका ‘या’ चुका; होईल देवीचा कोप!

By Harshada Bhirvandekar
Oct 05, 2024

Hindustan Times
Marathi

शारदीय नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवी आई आपल्या भक्तांना भेटण्यासाठी भूतलावर येते.

या नऊ दिवसांत देवी आई आपल्या भक्तांवर कृपा करते. मात्र, या काळात असे काही कामे आहेत, जी चुकूनही करू नयेत...

या नऊ दिवसांत आपल्या दरवाज्यासमोर कचरा ठेवू नका. देवी लक्ष्मीचे आगमन आपल्या दरवाज्यातूनच होते.

या दिवसांत जे लोक आपल्या दारासमोर कचरा ठेवतात, देवी लक्ष्मी त्यांच्या  दारातूनच परत निघून जाते. 

जे लोक सकाळी उशिरापर्यंत झोपून राहतात, त्यांच्यावर देवी आई रुष्ट होते आणि त्यांना यश मिळत नाही.

रोज सकाळी लवकर उठून पूजा करावी. यामुळे देवी आई प्रसन्न होते आणि घरात सुख समृद्धी येते.

या नऊ दिवसांत चुकूनही स्त्रीचा अपमान करू नका. ज्या घरात स्त्रीचा अपमान होतो तिथे लक्ष्मी येत नाही.

रात्रीची खरकटी भांडी तशीच ठेवल्याने घरात दारिद्र्य येते. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते.

या नऊ दिवसांत जे लोक व्रत करतात, त्यांच्या घरातील लोकांनी कांदा, लसूण, मांस आणि मद्य सेवन करू नये.

गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान