आर्थिक वर्षांचा शेवटचा महिना सुरू आहे. इन्कम टॅक्सपासून ते अनेक महत्त्वाच्या योजनांची मुदत मार्चमध्ये संपत आहे. जाणून घेऊया सविस्तर
२०२३-२४ या वर्षातील उत्पन्नावर कर बचत करायची असेल तर कर सवलत देणाऱ्या योजनांमध्ये लवकर गुंतवणूक करा. त्यासाठी ३१ मार्च ही डेडलाइन आहे.
आधार कार्ड मोफत अपडेट करण्यासाठी १४ मार्चपर्यंतची मुदत आहे. ही तारीख चुकल्यास तुम्हाला या कामासाठी पैसे मोजावे लागतील.
पेटीएम पेमेंट्स बँकेच्या सेवा १५ मार्चपर्यंत सुरू राहणार आहेत. त्याआधी तुमचे पैसे काढून घ्या व इतरत्र डिपॉझिट करा.
एसबीआय अमृत कलश FD योजनेत गुंतवणूक करण्यासाठी ३१ मार्च २०२४ ही शेवटची तारीख आहे. या योजनेत सर्वसाधारण ग्राहकांना ७.१० %, तर ज्येष्ठांना ७.६० % व्याज मिळते.
SBI Wecare योजनेत सहभागी होण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२४ आहे. तसंच, एसबीआय होम लोनवर विशेष सूट ३१ मार्चपर्यंत मिळणार आहे.
IDBI स्पेशल एफडीमध्ये गुंतवणुकीसाठी शेवटची तारीख ३१ मार्च आहे. या योजनेत ३००, ३७५ आणि ४४४ दिवसांच्या एफडीवर अनुक्रमे ७.०५, ७.१० आणि ७.२५ टक्के व्याज मिळेल.