गंगा स्नान करताना चुकूनही करू नका ‘या’ गोष्टी!

By Harshada Bhirvandekar
May 10, 2024

Hindustan Times
Marathi

सनातन धर्मात नद्यांना देवीचे रूप मानले जाते. या नद्यांमध्ये मोक्ष देणारी माता गंगा हिला विशेष महत्त्व आहे.

धार्मिक मान्यतेनुसार गंगेत स्नान केल्याने सर्व पापे धुऊन जातात. त्यामुळे बरेच लोक गंगा स्नान करण्यासाठी गर्दी करतात.  

गंगा स्नान केल्याने शारीरिक आणि मानसिक वेदनांपासून आराम मिळतो, असेही मानले जाते.  

गंगेत स्नान करण्यासाठी शास्त्रात काही नियम सांगितले आहेत, जे गंगेत स्नान करताना लक्षात ठेवले पाहिजेत.

असे मानले जाते की, गंगेत स्नान करण्यापूर्वी गंगा मातेला स्पर्श करून नमस्कार करावा.  

गंगेत स्नान करताना शरीरावरील घाण त्यात धुवू नका. याशिवाय चुकूनही साबण किंवा शॅम्पू वापरू नका. 

गंगेत स्नान केल्यानंतर अंगावरील पाणी लगेच पुसून टाकू नका.  

गंगा नदीत मलमूत्र विसर्जन करू नका. असे केल्याने तुम्हाला पाप लागते. गंगा नदीत कपडे धुणे देखील पाप मानले जाते.  

गंगा नदीत हार फुले किंवा इतर कोणत्याही प्रकारचा कचरा टाकू नका.

आजपासून या ५ राशींना शुभ काळ सुरू