समंथाने नवऱ्याला फसवलं? अभिनेत्रीने दिलं सणसणीत उत्तर!

By Harshada Bhirvandekar
Apr 11, 2024

Hindustan Times
Marathi

समंथा प्रभू आणि नागा चैतन्य २०२१मध्ये वेगळे झाले. त्यांच्या विभक्त होण्याचे खरे कारण कधीच उघड झाले नाही.

मात्र, दोघांनीही परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. दोघांच्या या निर्णयाने सगळ्यांना धक्का बसला होता.

आता समंथा सध्या तिच्या आजारावर मात करून अध्यात्माला वेळ देत आहे.

अशा परिस्थितीत जेव्हा एका युजरने समंथाला तिच्या एका पोस्टवर नागा चैतन्यची फसवणूक करण्याबद्दल विचारले. 

यावर आता अभिनेत्रीने असे सणसणीत उत्तर दिले. तिचे उत्तर ऐकून सगळेच कौतुक करत आहेत.

समंथा प्रभूने काही काळापूर्वी एक व्हिडीओ शेअर केला होता, ज्यामध्ये तिने तिच्या अध्यात्मिक प्रवासाबद्दल सांगितले होते. 

या व्हिडीओच्या कमेंट बॉक्समध्ये एका युजरने तिला एक विचित्र प्रश्न विचारला, ज्याला अभिनेत्रीने दुर्लक्ष न करता उत्तर दिले.

या व्हिडीओच्या कमेंटमध्ये एका युजरने लिहिले की, 'मला सांग तू तुझ्या निर्दोष पतीला का फसवलेस?

यावर उत्तर देताना समंथा प्रभूने उत्तर दिले की, 'माफ करा, हा व्यायाम तुम्हाला मदत करू शकत नाहीत. तुम्हाला दुसऱ्या उपचाराची गरज आहे.’

वयाच्या १५व्या वर्षी अक्षयच्या लेकाने सोडले घर