डेंटिस्ट बनली डान्सर! कसा होता धनश्रीचा प्रवास?
By
Harshada Bhirvandekar
Jan 13, 2025
Hindustan Times
Marathi
धनश्री वर्मा ही तिच्या डान्स आणि सौंदर्यामुळे नेहमीच चर्चेत असते. मात्र, आता ती वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.
धनश्री आणि तिचा पाती, क्रिकेटर युजवेंद्र चहल यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आले आहे.
सध्या सोशल मीडियावर धनश्री बद्दलची भरपूर माहिती सर्च केली जात आहे.
धनश्रीचा जन्म दुबईत झाला असून, ती नंतर मुंबईत स्थायिक झाली आहे.
धनश्रीचे शिक्षण जमनाबाई नरसी शाळेत झाले. नंतर तिने पदवी शिक्षण पूर्ण केले.
धनश्रीने डीवाय पाटील विद्यापीठातून वैद्यकीय शास्त्रात पदवी घेतली आहे.
डेंटिस्ट म्हणून धनश्रीने तिच्या करिअरची सुरुवात केली. पण तिला नृत्यात रस होता.
आपल्या नृत्याची अदा दाखवण्यासाठी तिने 'झलक दिखला जा'मध्ये भाग घेतला होता.
धनश्री वर्मा हिने काही म्युझिक व्हिडिओमध्ये देखील काम केले आहे.
धनश्री वर्माची एकूण संपत्ती २५ कोटी रुपये आहे. ती अभिनय आणि डान्समधून खूप कमाई करते.
जया एकादशीला विष्णू देवाला अर्पण करा या पदार्थांचा नैवेद्य
पुढील स्टोरी क्लिक करा