तोंडाला पाणी आणणारा स्वादिष्ट 'मुग दाल हलवा'!
Pinterest
By
Harshada Bhirvandekar
Jan 29, 2025
Hindustan Times
Marathi
जर तुम्हाला काहीतरी गोड खायची इच्छा झाली असेल, तर स्वादिष्ट मूग दाल हलवा तुम्ही घरीच बनवू शकता.
Pinterest
साहित्य : अर्धी वाटी मूग डाळ पीठ, २ वाट्या दूध, अर्धी वाटी तूप, १ वाटी साखर, १ चमचा वेलची पूड, २ चमचे बारीक चिरलेले पिस्ते आणि बदाम.
Pinterest
कृती : एका भांड्यात थोडे तूप गरम करा. त्यात डाळीचे पीठ सुवासिक होईपर्यंत चांगले भाजून घ्या.
Pinterest
नंतर गॅस थोडा कमी करा आणि थोडे थोडे दूध घाला. मिश्रण गुठळ्या होणार नाही, याची काळजी घेत सतत ढवळा.
Pinterest
नंतर या मिश्रणात साखर घाला आणि चमच्याने सतत ढवळत रहा. साखर विरघळल्यावर हलवा घट्ट होईल. साखरेऐवजी गूळही घालता येतो.
Pinterest
हलवा घट्ट होऊ लागला की, त्यात वेलची पूड घालून मिक्स करा. यामुळे तो अधिक स्वादिष्ट बनतो.
Pinterest
तूप हलव्यातून थोडे वेगळे होऊ लागले की, तयार झाला तुमचा हलवा! आता त्यात बारीक चिरलेला पिस्ता आणि बदाम घालून सर्व्ह करा.
Pinterest
तुमच्या घरी अचानक पाहुणे आल्यावर तुम्हीही हा गोडाचा पदार्थ बनवू शकता.
Pinterest
लिंबाचे सरबत
नाश्ता करण्याआधी लिंबू पाणी प्यायल्याचे फायदे
PEXELS
पुढील स्टोरी क्लिक करा