बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्री लवकरच बनणार आई!

By Harshada Bhirvandekar
Jun 30, 2024

Hindustan Times
Marathi

अभिनेत्री रिचा चढ्ढा आणि अली फजल लवकरच आई-वडील होणार आहेत. या जोडीने २०२२मध्ये लग्न केले होते.

या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात त्यांनी आनंदाची बातमी शेअर केली. रिचा जुलै किंवा ऑगस्टमध्ये बाळाला जन्म देऊ शकते.  

अभिनेत्री दीपिका पदुकोण लवकरच आई होणार आहे. अभिनेत्री २०१८मध्ये रणवीर सिंह सोबत लग्न केले होते.

दीपिका आणि रणवीर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत, आपलं बाळ सप्टेंबरमध्ये जन्माला येणार असल्याची माहिती दिली होती.  

नीना गुप्ता यांची मुलगी आणि फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता ही लवकरच आई होणार आहे. २०२३मध्ये तिने सत्यदीप मिश्रासोबत लग्न केले होते.  

गर्भधारणे दरम्यान, मसाबाला मुरूमच्या समस्येचा त्रास होत आहे. मात्र तरीही ती आनंदात असल्याची पोस्ट तिने केली आहे.  

अभिनेता प्रिन्स नरूला आणि अभिनेत्री युविका चौधरी ही जोडीही यावर्षी आई-वडील होणार आहे. २०१८मध्ये या जोडीने लग्न केलं होतं.  

प्रिन्स नरूला याने स्वतः एक पोस्ट लिहिली आणि आपल्या मोठा कार सोबतच एका छोट्या कारचे फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी दिली.

अभिनेत्री दृष्टी धामी ही याच वर्षी ऑक्टोबरमध्ये आई होणार आहे. नुकतीच तिने सोशल मीडियावर ही आनंदाची बातमी शेअर केली.

वेट लॉस डाएटसाठी हे आहेत लो-कार्ब पदार्थ

Photo Credits: Pexels