दीपिका पादुकोणने नाकारले ७ हिट चित्रपट!
By
Harshada Bhirvandekar
Jan 05, 2025
Hindustan Times
Marathi
अभिनेत्री दीपिका पादुकोण हिचा आज वाढदिवस असून, ती ३९ वर्षांची झाली आहे.
दीपिका ही बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने आजवर अनेक हिट चित्रपट दिले आहेत.
मात्र, दीपिकाने तिच्या करिअरमध्ये काही चांगल्या चित्रपटांना नाकारला देखील आहे, चला एक नजर टाकूया..
'रॉय' हा चित्रपट २०१५ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात रणबीर कपूर मुख्य भूमिकेत होता. मात्र, दीपिकाने काम करायला नकार दिला.
सलमान खानचा सुपरहिट चित्रपट 'सुलतान' आधी दीपिकाला ऑफर करण्यात आला होता. मात्र, तिने नाकारल्यानंतर तो अनुष्काकडे गेला.
रणबीर कपूर स्टारर 'रॉकस्टार' हा चित्रपटही दीपिकाला ऑफर करण्यात आला होता. मात्र, तिने नकार दिला आणि नर्गिसकडे ही भूमिका गेली.
'फास्ट अँड फ्युरियस ७' या चित्रपटासाठी दीपिकाला विचारण्यात आले होते. मात्र, डेट्स नसल्यामुळे तिने हा चित्रपट नाकारला.
२०१५मध्ये 'दिल धडकने दो' हा चित्रपट दीपिकाला ऑफर करण्यात आला. मात्र तिने या चित्रपटालाही नकार दिला.
'बार बार देखो' या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रासोबत दीपिका झळकणार होती. मात्र, तिने या चित्रपटासाठी नकार दर्शवला.
'जब तक है जान' या चित्रपटात शाहरुखसोबत दीपिकाला विचारण्यात आलं होतं. मात्र, काही कारणांमुळे दीपिका हा चित्रपट करू शकली नाही.
झणझणीत मिरचीचा ठेचा कसा बनवायचा?
पुढील स्टोरी क्लिक करा