BAFTA 2024मध्ये दीपिका पादुकोणचा जलवा!
Photo: Instagram
By
Harshada Bhirvandekar
Feb 19, 2024
Hindustan Times
Marathi
मनोरंजन विश्वातील अतिशय प्रतिष्ठित ‘बाफ्टा २०२४’ हा पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला आहे.
Photo: Instagram
जगभरातील चाहते आणि कलाकार या पुरस्कार सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत होते.
Photo: Instagram
ब्रिटिश अकादमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन आर्ट्स अर्थात ‘बाफ्टा’च्या यंदाच्या पुरस्कार सोहळ्यामध्ये अनेक कलाकारांनी आपला जलवा दाखवला.
Photo: Instagram
यावेळीचा ‘बाफ्टा अवॉर्ड्स २०२४’ भारतीयांसाठी देखील खास होता.
Photo: Instagram
यावेळी हॉलिवूड स्टार्सनीच नाही, तर बी-टाउन ब्युटी दीपिका पादुकोणने देखील ‘बाफ्टा’ पुरस्कार सादर केला आहे.
Photo: Instagram
यंदाच्या या प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण भारतीय अभिनेत्री आणि पुरस्कार सादरकर्ती म्हणून सामील झाली होती.
Photo: Instagram
या पुरस्कार सोहळ्यात दीपिकाने प्रचंड वाहवा मिळवली. चाहते अभिनेत्रीच्या लूकचे खूप कौतुक करत आहेत.
Photo: Instagram
या कार्यक्रमातील दीपिकाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Photo: Instagram
दीपिका पादुकोणने या पुरस्कार सोहळ्यातील तिचा लूक इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
Photo: Instagram
उफ्फ तेरी अदा! दिशा पटाणीच्या फोटोंची चर्चा
पुढील स्टोरी क्लिक करा