आज 'या' राशींसाठी भाग्योदयाचा दिवस

By Rohit Bibhishan Jetnavare
Mar 15, 2024

Hindustan Times
Marathi

आज शुक्रवार (१५ मार्च) चंद्र मंगळ योगाचा दिवस पाच राशींसाठी भाग्योदयाचा आहे. कोणत्या आहेत या राशी? जाणून घेऊया

चंद्रबळ पाठिशी आहे. नवीन कामकाज सुरू करण्यासाठी अनुकूल काळ आहे. ठोस निर्णय घेता येतील. नोकरी-व्यवसायात आर्थिक वृद्धीचा योग आहे.

मेष

गुंतवणुकीसाठी चांगला दिवस. वाहन खरेदीचा योग आहे. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील व्यक्तींसाठी ग्रहमान अनुकूल आहे. शुभ रंगः तांबूस शुभ दिशाः दक्षिण. शुभ अंकः ०४, ०९.

चंद्रबळ उत्तम असल्यामुळं आज शुभ दिवस आहे. व्यापाऱ्यांच्या कौटुंबिक जीवनात आर्थिक समृद्धी आणणारा दिवस आहे.  नोकरीत समाधानकारक वातावरण लाभेल. 

कर्क

राजकीय, सामाजिक व कला क्षेत्रातील व्यक्तींसाठी चांगला दिवस आहे. सरकारी योजना मार्गी लागतील. शुभ रंग: पांढरा शुभ दिशा: वायव्य. शुभ अंकः ०४, ०७.

मंगळ-चंद्र योग आर्थिकदृष्ट्या लाभदायक ठरेल. स्थावर मालमत्तेचे प्रश्न सुटतील. कौटुंबिक सुख लाभेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी प्राप्त कराल.

मिथुन

 प्रवासातून आर्थिक लाभ होतील. व्यापारी वर्गासाठी आकस्मिक धनलाभ योग आहे. परदेश वारीचा योग आहे. शुभ रंग: पोपटी शुभ दिशा: उत्तर. शुभ अंकः ०१, ०४.

चंद्रमंगळ योगामुळं दिनमान उत्तम राहील. नोकरदारांसाठी दिवस उत्तम आहे. प्रमोशन मिळू शकते. आत्मविश्वास उंचावलेला असेल. मित्रमंडळी, नातेवाईकांकडून मदतीचा हात पुढं येईल. 

सिंह

आर्थिक बाबतीत समाधानी राहाल. कौटुंबिक सुखाचा अनुभव घ्याल. सरकारी योजनेचा लाभ होईल. शुभ रंग: लालसर शुभ दिशा: पूर्व. शुभ अंकः ०५, ०८.

कन्या राशीचा स्वामी मंगळ उत्तम स्थितीत आहे. आर्थिक स्थिती उत्तम होईल. तुमची वाणी आणि व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव इतरावर पडेल. कुटुंबातून चांगली वार्ता कानी पडेल. 

कन्या

व्यापाऱ्याना अनपेक्षित फायदा होईल. प्रेमप्रकरणात यश लाभेल. जमीन खरेदी-विक्रीतून अधिक लाभ होईल. शुभ रंगः हिरवा शुभ दिशाः उत्तर. शुभ अंकः ०१, ०९.

गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान