तेलात न फुटणारे कुरकुरीत साबुदाणा वडे!

By Aiman Jahangir Desai
Dec 29, 2024

Hindustan Times
Marathi

साहित्य- १ वाटी साबुदाणा, ३ बटाटे, १/४ कप शेंदण्याचा कूट, २ हिरव्या मिरच्या बारीक चिरून, ५-६ कढीपत्ता बारीक चिरून, २ चमचे कोथिंबीर बारीक चिरून १ टीस्पून जिरे, चवीनुसार मीठ

साबुदाणामध्ये एक कप पाणी घाला आणि रात्रभर भिजवा.

उकडलेले बटाटे हाताने मॅश करा. आता शेंगदाणा भाजून कूट बनवा. 

नंतर एका भांड्यात साबुदाणा टाकून त्यात मॅश केलेले बटाटे घाला. 

आता यामध्ये  शेंगदाणा कूट, कढीपत्ता, कोथिंबीर, जिरे आणि मीठ घालून एकजीव करा. 

नंतर त्याचे छोटे वडे बनवून हाताने दाबून थोडेसे चपटे करा.

गरम तेलात टाका आणि मंद आचेवर सोनेरी रंग होईपर्यंत भाजून घ्या. 

लाईमलाईटपासून दूर राहतात 'या' बॉलिवूड वाईफ्स!