थंड की कोमट, शरीरासाठी कोणते दूध चांगले?

Pexels

By Hiral Shriram Gawande
Apr 25, 2024

Hindustan Times
Marathi

काही जण कोमट तर काही लोक थंड दूध पितात. पण तुम्हाला माहित आहे काय चांगले आहे? जाणून घ्या

Pexels

दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ आपल्या रोजच्या आहारात ठेवले पाहिजे.

Pexels

दुधाचे नियमित सेवन आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. त्यात कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि पोटॅशियम असते. ते शरीराला पोषण देतात. जेव्हा दूध पिण्याचा प्रश्न येतो तेव्हा गरम आणि थंड दोन्ही दुधाची वैशिष्ट्ये भिन्न असतात.

Pexels

कोमट दूध पिण्याचा एक फायदा म्हणजे ते अधिक सहज पचते. जर तुम्हाला लॅक्टोजयुक्त पदार्थ पचण्यास त्रास होत असेल तर तुम्ही कधीही थंड दूध पिऊ नये.

Pexels

जर तुम्हाला स्लीप एपनिया असेल तर झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट दूध पिणे ही चांगले. दुधामध्ये ट्रिप्टोफॅन हे अमिनो ॲसिड असते जे तुम्हाला चांगली झोप घेण्यास मदत करते.

Pexels

पोटातील अॅसिडिटीच्या समस्येवर थंड दूध खूप फायदेशीर आहे. जेवल्यानंतर अर्धा ग्लास थंड दूध प्यायल्याने तुम्ही या समस्येपासून सुटका मिळवू शकता. त्यामुळे अशा समस्या असणाऱ्यांनी थंड दूध प्यावे.

Pexels

थंड दूध तुमच्या शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढू शकते. तसेच सकाळी थंड दूध पिणे चांगले. पण जर तुम्हाला सर्दी किंवा फ्लूची समस्या असेल तर थंड दूध पिऊ नका.

Pexels

डॉक्टरांच्या मते, जास्त गरम झालेले दूध टाळणे चांगले. त्याऐवजी तुम्ही कोमट दूध पिऊ शकता. कारण जास्त गरम दुधामुळे पोटाचा त्रास होऊ शकतो.

Pexels

तसेच फ्रीजमधले थंड दूध पिऊ नये. थोडा वेळ बाहेर राहू द्या आणि नंतर सामान्य तापमानात आल्यानंतर प्या. मग त्याचा पूर्ण फायदा तुम्हाला मिळेल.

Pexels

पचन शक्ती बूस्ट करण्यासाठी चहामध्ये घाला हे मसाले!