या ९ परंपरेशिवाय नाताळ होऊ शकत नाही साजरा

By Priyanka Chetan Mali
Dec 20, 2024

Hindustan Times
Marathi

जगभरात दरवर्षी २५ डिसेंबर रोजी नाताळ सण साजरा केला जातो. हा दिवस येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो. 

या दिवशी ख्रिश्चन अनुयायी एकमेकांना विविध भेटवस्तू, शुभेच्छापत्रे देऊन परस्परांचे अभिनंदन करतात. तसेच आपापल्या घरांना रोषणाई करून घर सजवले जाते.

नाताळच्या दिवशी चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करतात. तसेच, यादिवशी अनेक परंपरा निभावतात. मान्यतेनुसार याशिवाय ख्रिसमस अपूर्ण मानली जाते.

नातळच्या दिवशी ख्रिसमस-ट्री सजवले जाते. ख्रिसमस ट्रीला घंटी, भेटवस्तू, लायटिंग आणि इतर शो च्या वस्तूंनी अतिशय सुंदर आणि आकर्षक पद्धतीने सजवतात.

नाताळला लहान मुलं सांता क्लॉजच्या येण्याने फार उत्साहित होतात. कारण सांता क्लॉज लहान मुलांना चॉकलेट, केक, भेटवस्तू वाटतो असे मानले जाते.

भारतातील ख्रिसमसचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे जन्म देखावा तयार करणे. यात बाळ येशुला मैरी आई आणि युसुफ वडील यांच्या हातात दाखवले जाते.

ख्रिसमसच्या दिवशी चर्चमध्ये विशेष प्रार्थना होते आणि जिंगल बेल, ओह होली नाइट अशी अनेक गाणे म्हणून आनंददायक वातावरण तयार करतात.

नाताळला विविध देशात विविध पद्धतीचे खाद्यपदार्थ तयार केले जातात. तसेच केक बनवून कापतात आणि एकमेकांना खाऊ घालतात.

ख्रिसमला घंटी वाजवण्याचीही परंपरा आहे. ज्याला रिंगिंग बेल असे म्हणतात. असे म्हणतात यामुळे नकारात्मकता दूर होते आणि आनंदात वाढ होते.

नाताळच्या दिवशी लोकं चर्चमध्ये जाऊन मेणबत्ती लावतात आणि विशेष प्रार्थना करतात.

नाताळला लाल किंवा हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करण्याची परंपरा आहे.

या दिवशी ख्रिश्चन अनुयायी एकमेकांना चर्चमध्ये भेटून मेरी ख्रिसमसच्या शुभेच्छाही देतात.

डिस्क्लेमर : ही माहिती केवळ धार्मिक श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही.

लहान मुलांसाठी बनवा चॉकलेट चिक्की!