चातुर्मासात चमकेल या ४ राशींचे भाग्य

By Rohit Bibhishan Jetnavare
Jul 08, 2024

Hindustan Times
Marathi

आषाढातील देवशयनी एकादशीपासून चातुर्मास सुरू होईल, या दिवसापासून श्री हरी ४ महिने योगनिद्रात जातील. 

२०२४ चा चातुर्मास काही राशींसाठी चांगला राहील, त्यांचे निद्रिस्त भाग्य जागृत होऊ शकते.

चातुर्मास १७ जुलै २०२४ रोजी देवशयनी एकादशीपासून सुरू होईल, १२ नोव्हेंबरला देवूथनी एकादशीला संपेल.

या वर्षी चातुर्मास म्हणजे श्रावण, भाद्रपद, अश्विन आणि कार्तिक हे महिने काही राशींसाठी खूप फायदेशीर ठरणार आहेत. 

यामध्ये कर्क, कुंभ, मिथुन आणि कन्या राशीच्या लोकांवर भगवान शिव आणि विष्णूच्या आशीर्वादांचा वर्षाव होईल.

कुंभ राशीच्या लोकांना चातुर्मासात जुन्या गुंतवणुकीतून आर्थिक लाभ मिळू शकतो. नोकरीत येणारे अडथळे दूर होतील. मानसिक तणावातून आराम मिळेल. व्यवसायात वाढेल.

कर्क राशीच्या लोकांसाठी चातुर्मासाचा ४ महिन्यांचा काळ सुखाचा असेल. वैवाहिक जीवनात आनंद राहील. प्रत्येक कामात यश मिळेल. उत्पन्न वाढेल.

कन्या राशीच्या लोकांसाठी चातुर्मासाच्या मुहूर्तावर पैशांचा ओघ वाढण्याची शक्यता आहे. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळू शकतो. नोकरीच्या संधी उपलब्ध होतील.

मिथुन राशीच्या लोकांसाठी चातुर्मास खूप चांगला असणार आहे. आर्थिक स्थिती चांगली राहील. शुभ कार्य पूर्ण होतील. लव्ह लाईफमध्ये गोडवा वाढेल. 

‘या’ मुलांकाचा स्वामी आहे राहू; नशिबात आणेल भरभराट!