घटस्फोटानंतर ‘या’ अभिनेत्रींवर झाले घर तोडल्याचे आरोप!

By Harshada Bhirvandekar
Jul 25, 2024

Hindustan Times
Marathi

चित्रपट सृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहे, ज्यांना घटस्फोटानंतर ट्रोलिंगचा सामना करावा लागलाय. 

अभिनेत्री नताशा स्टेनकोविकने नुकताच हार्दिक पांड्यापासून घटस्फोट घेतला. यानंतर लोकांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केल्याने तिने आपले कमेंट सेक्शन बंद केले. 

अभिनेता हृतिक रोशनपासून घटस्फोट घेतल्यानंतर सुजैन खानला देखील ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.

सोशल मीडियावर चर्चेत असणारी अभिनेत्री कुशा कपिला हिने देखील घटस्फोट घेतला आहे. मात्र, तिने यश मिळाल्यानंतर पतीला सोडलं, असा आरोप अनेकांनी तिच्यावर केला. 

अभिनेत्री समंथा रूथ प्रभू हिने नागा चैतन्य घटस्फोट दिला. यानंतर लोकांनी समंथालाच दोष दिला होता. 

अभिनेत्री चारू असोपा हिने पती राजीव सिंहला घटस्फोट दिला. या दोघांना एक मुलगी देखील आहे. दुसरे लग्नही मोडल्याने लोकांनी चारूलाच ट्रोल केलं. 

अभिनेत्री कीर्ती कुल्लारी हिनेदेखील साहिल सहगलशी झालेले लग्न मोडले, तेव्हा लोकांनी तिला खूप ट्रोल केले होते.

या यादीत मलायका अरोराच्या नावाचाही समावेश आहे. अरबाज खानपासून घटस्फोट घेतल्यानंतर लोकांनी तिला खूपच ट्रोल केले होते. 

अभिनेत्री संजिदा शेखने आमीर अलीला घटस्फोट दिला, तेव्हा तिला देखील संसार मोडल्याबद्दल दोष दिला गेला होता. 

अभिनेत्री अमृता सिंहने सैफ अली खानपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला, तेव्हा लोक अमृतालाच रिलेशनशिप ब्रेकर म्हणत होते.

गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान