या राशीच्या लोकांनी मांजर पाळू नये
By
Rohit Bibhishan Jetnavare
Apr 25, 2024
Hindustan Times
Marathi
अनेकांना घरांमध्ये पाळीव प्राणी-पक्षी पाळण्याची आवड असते. काही लोक कुत्रे पाळतात तर काहीजण मांजर, पोपट पाळतात.
पण तुम्हाला माहित आहे का की ज्योतिषशास्त्रात अशा काही राशी आहेत, ज्यांनी मांजर पाळू नये.
या राशीच्या लोकांनी मांजर पाळल्यास जीवनात अशुभ परिणाम घडतात. या राशी कोणत्या आहेत, ते जाणून घेऊया.
मेष राशीच्या लोकांनी मांजर पाळू नये, कारण त्यांचा ग्रह मंगळ आहे. त्याचबरोबर राहूचा प्रभाव मांजरावर अधिक असतो आणि मांजर हे राहूचे वाहनही मानले जाते.
मेष
त्यामुळे ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीच्या लोकांना मांजर न पाळण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे त्यांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
ज्योतिष शास्त्रानुसार कन्या राशीच्या लोकांनी चुकूनही मांजर पाळू नये, कारण त्यांचा अधिपती ग्रह बुध आहे आणि मांजरीवर राहूचा प्रभाव आहे.
कन्या
म्हणूनच या राशीच्या लोकांनी मांजर पाळली तर त्यांच्या आयुष्यात आर्थिक समस्या वाढतात. तसेच कुंडलीत बुधाची स्थिती बिघडू लागते.
मिथुन राशीच्या लोकांनी मांजर पाळू नये, कारण या राशीचा थेट संबंध बुध ग्रहाशी आहे.
मिथुन
या राशीच्या लोकांनी मांजर पाळली तर त्यांना मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते. याशिवाय त्यांच्या आयुष्यात मानसिक आजारांचा धोका वाढतो.
प्रियजनांना मिठी मारण्याचे भन्नाट फायदे!
pixabay
पुढील स्टोरी क्लिक करा