हिंदू धर्मात अक्षय्य तृतीयेला खूप महत्त्व आहे. दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाला हा उत्सव साजरा केला जातो.
यावर्षी म्हणजेच २०२४मध्ये हा सण १० मे रोजी साजरा केला जाणार आहे. अक्षय्य तृतीयेची तिथी शुभ मानली जाते.
असे मानले जाते की, या दिवशी संपत्तीचा देव कुबेर याला सोन्याचे भांडार मिळाले होते.
या दिवशी एखादा धार्मिक विधी करणे किंवा सोने चांदी खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. या शुभकार्याचे पुण्य कधीच संपत नाही, असे म्हणतात.
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने किंवा चांदीचे दागिने खरेदी करणे शुभ मानले जाते. या दिवशी तुम्ही सोने किंवा चांदीचे दागिने, नाणी यासारख्या वस्तू खरेदी करू शकता.
पण, जर वाढत्या महागाईमुळे तुम्ही या दिवशी सोनं-चांदी खरेदी करू शकत नसाल, तर इतर अनेक गोष्टी खरेदी करणं शुभ मानले जाते.
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी मातीचे भांडे, पिवळी मोहरी, भांडी, कवड्या, दक्षिणावर्ती शंख, श्रीयंत्र किंवा धणे खरेदी करणं शुभ मानलं जातं.
मात्र, अक्षय तृतीयेच्या दिवशी प्लास्टिक, काळे कपडे, काटेरी वस्तू किंवा चाकू यासारख्या गोष्टींची खरेदी करू नये.
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान