आठवड्यातील या दिवशी करा सोनं खरेदी, लक्ष्मी होईल प्रसन्न

By Priyanka Chetan Mali
Feb 04, 2025

Hindustan Times
Marathi

हिंदू धर्मात सोनं हे शुभ धातू मानले जाते. यामुळे सोनं खरेदी करताना काही गोष्टिंची काळजी घ्यावी असे सांगतात.

जाणून घेऊया कोणत्या दिवशी सोने खरेदी करणे लाभाचे ठरते.

असे सांगितले जाते की, शुभ दिवशी खरेदी केलेल्या वस्तू घरात सकारात्मकता आणतात आणि त्यामुळे लाभ होतो.

अक्षय्य तृतीया किंवा धनतेरसच्या दिवशी खरेदी केलेलं सोनं शुभ फळ देते आणि यामुळे लक्ष्मीची सदैव कृपा राहते. 

परंतू याशिवाय आणखी काही वार ही आहे जेव्हा सोनं खरेदी केल्याने शुभ फळ प्राप्त होते.

तुम्ही गुरुवार आणि रविवार यादिवशी सोनं खरेदी करू शकतात.

या दिवशी सोनं खरेदी केल्याने कुंडलीतील गुरु ग्रह आणि सूर्य ग्रहाची स्थिती मजबूत होते. 

गुरुवार आणि रविवारसह तुम्ही पुष्य नक्षत्रालाही सोनं खरेदी करू शकतात. पुष्य नक्षत्रात कोणताही वार असला तरी सोनं खरेदी करता येते.

डिस्क्लेमर : ही माहिती केवळ धार्मिक श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही.