खऱ्या आयुष्यात भावंडं आहेत ‘हे’ कलाकार! तुम्हाला माहितीय काय?

By Harshada Bhirvandekar
May 24, 2024

Hindustan Times
Marathi

चित्रपटात जबरदस्त अभिनय करणारे अनुपम खेर यांचे छोटे बंधू राजू खेर हे देखील अभिनय क्षेत्रात सक्रिय आहेत. राजू खेर हे टीव्ही इंडस्ट्रीत काम करतात.

टीव्ही इंडस्ट्रीपासून ते चित्रपटांपर्यंत रोनित रॉयने आपल्या अभिनयाने सगळ्यांच्या हृदयात जागा बनवली आहे. त्याचा भाऊ रोहित रॉय हा टीव्ही इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहे.

अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने चित्रपटांमध्ये काम केलंय. तर, तिची लहान बहिण इशिता दत्ता हिने टीव्ही आणि चित्रपट दोन्ही विश्वांमध्ये आपली खास ओळख बनवली आहे.

टीव्ही आणि चित्रपटाच्या दुनियेत प्रसिद्ध असणारी अभिनेत्री गौहर खान हिची बहीण निगार ही देखील अभिनेत्री आहे. निगारने देखील अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे.  

कृष्णा अभिषेक हा अभिनेत्री आरती सिंह हिचा सख्खा भाऊ आहे. आरती ही अनेक वर्षांपासून टीव्ही मालिकांमध्ये काम करत आहे.  

मोठा पडदा असो वा छोटा... ‘बाबूजी’चं पात्र साकारणारे अभिनेते आलोकनाथ यांची बहीण विनिता मलिक ही देखील अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे.  

टीव्ही इंडस्ट्रीपासून ते चित्रपटांपर्यंत प्रवास करणारी अभिनेत्री रिद्धी डोगरा हिचा भाऊ अक्षय डोगरा हा देखील अभिनेता आहे. अक्षय ‘प्यार को क्या नाम दु’ या मालिकेमध्ये दिसला होता.  

‘ये हे मोहब्बते’ मिहिका हिचा भाऊ मिश्कत वर्मा हा देखील टीव्ही विश्वात सक्रिय आहे. 

अभिनेता वरूण बडोला हा चित्रपट आणि वेब सीरिज बरोबरच, मालिका विश्वात देखील अतिशय प्रसिद्ध आहे. त्याची बहीण अलका कौशल ही देखील प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे.  

अभिनेत्री मेहेर वीज हिने टीव्ही आणि चित्रपट विश्वात आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला आहे. तिचा भाऊ पियूष सहदेव देखील मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेता आहे.

झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठी टिप्स

pixabay