अयोध्येत पोहचलेल्या कलाकारांचे काही खास क्षण! 

By Harshada Bhirvandekar
Jan 22, 2024

Hindustan Times
Marathi

गेल्या अनेक वर्षांच्या संघर्षानंतर आता अखेर अयोध्येत रामलल्लाचे आगमन झाले आहे.

प्रभू श्रीरामाच्या स्वागतासाठी मनोरंजन विश्वातील अनेक दिग्गज मंडळी अयोध्येत दाखल झाली होती.

रामलल्लाच्या स्वागतासाठी अयोध्येत एका भव्यदिव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं.

या भव्य सोहळ्यासाठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार देखील अयोध्येसाठी रवाना झाले होते.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासह आलिया-कतरिना देखील अयोध्येला पोहोचल्या होत्या.

तर, साऊथ स्टार रजनीकांत, चिरंजिवी आणि रामचरण देखील अयोध्येला गेले आहेत.

नुकतेच या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यातील कलाकारांचे काही फोटो समोर आले आहेत.

माधुरी दीक्षित ते सोनू निगम अनेक कलाकार यावेळी रामलल्लाचे दर्शन घेताना दिसले.

सध्या सोशल मीडियावर राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

हार्मोनल असंतुलन सुधारणारे  ‘हे’ पदार्थ माहितीयत?