‘या’ अभिनेत्रींनी बांधली सहकलाकारांसोबत लग्नगाठ!
By
Harshada Bhirvandekar
Jun 26, 2024
Hindustan Times
Marathi
झहीर आणि सोनाक्षी सिन्हा यांचे लग्न नुकतेच थाटामाटात पार पडले आहे. त्यांच्या रिसेप्शन पार्टी अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.
सोनाक्षी आणि झहीर इक्बाल यांनी ‘डबल एक्सएल’ या चित्रपटात एकत्र काम केले होते.
जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांनी ‘गुड्डी’, ‘अभिमान’, ‘बन्सी’ अशा चित्रपटात एकत्र काम केले होते. नंतर दोघांचे लग्न झाले.
दीपिका पदुकोणने रणवीर सिंहसोबत तीन चित्रपटात काम केले. यानंतर त्यांनी २०१८ मध्ये लग्न केले.
कियारा अडवाणीने अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत लग्न केले आहे. लग्नापूर्वी दोघांनी ‘शेरशाह’ चित्रपटात एकत्र काम केले.
अभिनेत्री ऐश्वर्या रायने लग्नापूर्वीच अभिषेक बच्चनसोबत ‘ढाई अक्षर प्रेम के’, ‘गुरु’, ‘धूम २’ यासारख्या चित्रपटात काम केले होते.
अभिनेत्री काजोलने सहकलाकार असणाऱ्या अजय देवगण सोबत लग्नगाठ बांधली.
अभिनेत्री करीना कपूरने सैफ अली खानसोबत ‘टशन’, ‘ओंकारा’ ‘एजंट विनोद’ अशा चित्रपटांमध्ये काम केले आहे.
अभिनेत्री बिपाशा बसूने देखील सहकलाकार असणाऱ्या करण सिंह ग्रोवर सोबत लग्न केले.
आलिया भट्ट हिने पती रणबीर कपूरसोबत ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात एकत्र काम केले होते.
डिलिव्हरीनंतर खायला पौष्टिक पंजिरीची रेसिपी!
पुढील स्टोरी क्लिक करा