बीएमडब्ल्यू एम ३ सीएस टूरिंग बाजारात दाखल

By Ashwjeet Rajendra Jagtap
Jan 30, 2025

Hindustan Times
Marathi

बीएमडब्ल्यू एम ३ सीएस टूरिंग लिमिटेड एडिशन मॉडेल म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारात लाँच झाली आहे.

स्पोर्ट्स इस्टेटची किंमत १२०,६०० पौंड म्हणजेच भारतीय चलनात अंदाजे १.०८ कोटी रुपये आहे.

ही कार बीएमडब्ल्यूची कॉम्पिटिशन स्पोर्ट (किंवा सीएस) बॅज असलेली पहिली इस्टेट स्टाईलची कार आहे.

बीएमडब्ल्यू एम ३ सीएस टूरिंगमध्ये फ्रंटमध्ये १९ इंच आणि मागच्या बाजूला २० इंच अलॉय देण्यात आले आहेत.

हे इंजिन ३ लीटर, इनलाइन-सिक्स इंजिन आहे, जे ६ हजार २५० आरपीएमवर ५५० बीएचपी पॉवर आणि २ हजार ७५० आरपीएमवर ६५० एनएम पीक टॉर्क जनरेट करते.

कारच्या आतील बाजूस बीएमडब्ल्यूचा कर्व्ड डिस्प्ले असून यात १२.३ इंचाचा इंस्ट्रूमेंट क्लस्टर आणि इन्फोटेन्मेंटसाठी १४.९ इंचाचा इंस्ट्रूमेंट क्लस्टर देण्यात आला आहे.

कारमध्ये अनेक कार्बन फायबर घटक देखील बसवण्यात आले आहेत, जे वजन कमी ठेवण्यास मदत करतात.

लाडू खा आणि वजन कमी करा!

Pixabay