पुण्याच्या राजकारणातील भाजपचा ‘चाणक्य’ हरपला..

पुण्याच्या राजकारणातील भाजपचा ‘चाणक्य’ हरपला..

By Shrikant Ashok Londhe
March 29 2023

Hindustan Times
Marathi

गिरीश बापट यांच्या निधनामुळं एक समन्वयी व सर्वसमावेशक नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

garish bapat

बापट हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झाले होते. आणीबाणीच्या काळात त्यांनी १९ महिने तुरुंगवास भोगला होता.

पदवीधर असलेले बापट हे टेल्को कंपनीत कामगार नेते होते. १९८० साली भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून ते राजकारणात सक्रिय झाले. पुणे भाजपचे सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली.

चार दशकांच्या राजकीय कारकीर्दीत गिरीश बापट यांनी आरएसएस स्वयंसेवक, कामगार नेता, नगरसेवक, आमदार, खासदार तसेच राज्यात मंत्रिपद अशा अनेक पदांवर काम केले.

पुण्यातील कसबा मतदारसंघातून गिरीश बापट सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले. पुण्याच्या राजकारण त्यांची ‘भाऊ’ म्हणून ओळख होती.

१९८३ मध्ये पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले. त्यानंतर तीन वेळी त्यांनी महापालिकेत प्रतिनिधित्व केले.

कसबा मतदारसंघातून त्यांनी १९९५ मध्ये पहिल्यांदा निवडणूक लढवली, त्यानंतर २०१४ पर्यंत सलग पाच वेळी बापट येथून निवडून आले.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना खासदारकीचे तिकीट देण्यात आले. या निवडणुकीत ते ९६ हजार मताधिक्यांनी निवडून आले.

नुकत्याच झालेल्या कसबा पेठ पोटनिवडणुकीत तब्येत साथ देत नसतानाही बापट भाजपच्या प्रचारासाठी मैदातान उतरले होते.