अवघ्या २४ वर्षांच्या सुहाना खानची संपत्ती किती? 

By Harshada Bhirvandekar
May 22, 2024

Hindustan Times
Marathi

शाहरुखने वर्षानुवर्षे जे स्टारडम मिळवले, ते त्याची मुलगी सुहानाने लहान वयात मिळवले.

सोशल मीडियावर सुहानाची फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे. वयाच्या अवघ्या २४व्या वर्षीही ती करोडोंच्या संपत्तीची मालकीण आहे.

गौरी खान आणि शाहरुख खान यांची एकुलती एक मुलगी सुहाना केवळ तिच्या आई-वडिलांचीच नाही, तर भावांचीही लाडकी आहे. 

सुहाना खान आलिशान जीवनशैली जगते. चित्रपटात येण्यापूर्वीच सुहाना करोडपती झाली होती. 

महागडे कपडे, बॅग ते महागड्या कार कलेक्शनपर्यंत तिच्याकडे सर्व काही आहे. 

चित्रपट पदार्पणापूर्वीच, सुहाना खान सौंदर्य उत्पादन मेबेलाइनची ब्रँड ॲम्बेसेडर बनली.

नुकतीच ती लक्स सोपची ब्रँड ॲम्बेसेडर बनली आहे, ज्यातून ती करोडोंची कमाई करते. 

रिपोर्ट्सनुसार, सुहाना खानचे न्यूयॉर्कमध्ये स्वतःचे एक आलिशान घर आहे, ज्याची किंमत कोट्यवधींची आहे.

काही काळापूर्वी तिने अलिबागमध्येही जमीन खरेदी केली होती, ज्याची किंमत १० कोटी रुपये आहे.

गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान