दहावी शिकलेला दिलजीत दोसांज कसा बनला रॉकस्टार?
By
Harshada Bhirvandekar
Jan 06, 2025
Hindustan Times
Marathi
गायक दिलजीत दोसांज आज त्याचा ४१वा वाढदिवस साजरा करत आहे.
त्याची गाणी सगळ्यांच्याच मनावर राज्य करतात. आपल्या गाण्यांमधून त्यांना एक विशेष ओळख निर्माण केली आहे.
दिलजीतचा जन्म ६ जानेवारी १९८४ रोजी पंजाबी मधील जालंधरमध्ये झाला होता.
त्याला लहानपणापासूनच गाणी गाण्याची आवड होती. तो गुरुद्वारामध्ये कीर्तन करायचा.
अभ्यासात मन रमत नसल्याने त्याने दहावीतच शिक्षण सोडून आपला मोर्चा संगीताच्या दिशेने वळवला.
त्याने त्याच्या करिअरची सुरुवात २००४मध्ये केली होती. तो चित्रपटांसाठी गाण्यासोबतच स्वतःचे लाईव्ह म्युझिक कॉन्सर्ट देखील करतो.
दिलजीतने आजवर अनेक हिंदी आणि पंजाबी चित्रपटांसाठी अभिनय देखील केला आहे.
२००९च्या 'द नेक्स्ट लेवल' या हानी सिंगबरोबरच्या अल्बममधून त्याला तुफान लोकप्रियता मिळाली.
दिलजीतच्या गाजलेल्या गाण्यांची यादी तशी भरपूर मोठी आहे. त्याच्या प्रत्येक गाण्याला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला.
प्रिया सरोज कोण आहे?
पुढील स्टोरी क्लिक करा