संग्राम समेळबद्दल ‘या’ गोष्टी माहितीयेत का?

By Harshada Bhirvandekar
Jul 24, 2024

Hindustan Times
Marathi

नाटक, मालिका आणि चित्रपट अशा वेगवेगळ्या माध्यमातून अभिनय विश्वात आपली हक्काची जागा निर्माण करणारा अभिनेता म्हणजे संग्राम समेळ.  

संग्राम समेळ याला अभिनयाचे बाळकडू त्याच्या घरातूनच मिळाला आहे. 

ज्येष्ठ नाटककार, लेखक आणि दिग्दर्शक अशोक समेळ व अभिनेत्री संजीवनी समेळ हे त्याचे आई-बाबा आहेत.

आई-वडील मनोरंजन क्षेत्रात कार्यरत असल्याने लहानपणापासूनच संग्रामचा ओढा देखील या क्षेत्राकडेच होता. 

संग्रामने मुलुंडच्या वझे-केळकर कॉलेजमधून मास मीडिया जाहिरात या विषयात पदवी घेतली. 

यानंतर त्याला अभिनयाची आवड शांत बसू देत नव्हती. ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘मन उधाण वाऱ्याचे’ अशा अनेक नाटकांमध्ये त्यांनी काम केलं. 

‘अश्रूंची झाली फुले’, ‘वर खाली दोन पाय’, ‘तोच परत आलाय’, ‘एकच प्याला’ अशा नाटकातही तो झळकला आहे.

अनेक मालिकांसोबतच, ‘योग योगेश्वर जय शंकर’ या मालिकेतून देखील त्याने एक आगळीवेगळी भूमिका साकारली होती.

आपल्या मेहनतीच्या आणि अभिनयाच्या बळावर त्याने मनोरंजन विश्वात आपलं हक्काचं स्थान निर्माण केला आहे.

१०८ मेगापिक्सेल कॅमेरा असलेल्या फोनवर मोठी सूट