नेमबाज श्रेयसी सिंह ऑलिम्पिकमधून बाहेर
By
Rohit Bibhishan Jetnavare
Aug 01, 2024
Hindustan Times
Marathi
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये बिहारच्या आमदार श्रेयसी सिंग यांनी आपला दम दाखवला. त्यांनी नेमबाजमध्ये ट्रॅप इव्हेंटमध्ये सहभाग नोंदवला होता.
पण पात्रता फेरीच्या पाचव्या राउंड अखेर श्रेयसी सिंग ११३ गुणांसह २२व्या स्थानावर राहिल्या.
यामुळे त्यांना शॉटगन ट्रॅप स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळू शकले नाही . यासह त्यांची ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याची शक्यताही संपुष्टात आली.
नेमबाजीत श्रेयसी यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदके जिंकली आहेत.
श्रेयसी यांनी २०१४ च्या ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत डबल ट्रॅप इव्हेंटमध्ये रौप्य पदक जिंकले होते.
यानंतर २०१८ च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये श्रेयसी यांनी सुवर्ण पदक पटकावले. २०१८ ला त्यांना अर्जुन पुरस्कार प्राप्त झाला.
श्रेयसी सिंह २०२० च्या विधानसभा निवडणूकीत बिहारच्या जमुई मतदार संघातून निवडून आल्या. त्यांनी आरजेडीच्या विजय प्रकाश यांचा ४१ हजार मतांनी पराभव केला.
श्रेयसी भाजपचे दिग्गज नेते आणि माजी खासदार दिग्विजय सिंग यांची मुलगी आहे. तसेच, श्रेयसी यांची आई पुतलु देवी बांका मतदारसंघाच्या खासदार होत्या.
बिना तेलाची 'क्रीमी दाल मखनी' कशी बनवायची?
पुढील स्टोरी क्लिक करा