'शेवंता'नं फॅन्सना फोडला घाम,  स्टायलिश साडीतील फोटोंनी केला कहर

Instagram

By Shrikant Ashok Londhe
Feb 09, 2024

Hindustan Times
Marathi

‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेमुळे महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली  शेवंता म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर आपल्या फॅशनमुळे नेहमी चर्चेत असते.

सध्या ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतून अपूर्वा प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.

अपूर्वाने अनेक मालिकांमधून काम करत आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.

शेवंताच्या पात्राने अपूर्वाला खूप लोकप्रिय बनवले होते. तसेच सोशल मीडियावर तिची फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे.

अपूर्वाने राखाडी रंगाची स्टायलिश साडी परिधान करत खुप सुंदर फोटोशूट केले आहे.

राखाडी रंगाची साडी व हल्का मेकअपमधील तिच्या निस्सिम  सौंदर्याचे चाहते कौतुक करत आहेत.

या फोटोशूटमध्ये अपूर्वाने ऑक्साईडचे दागिने परिधान करत व केस मोकळे सोडून आपल्या मादक अदांनी सर्वांचे लक्ष वेधले आहे.   

रुद्राक्षाचे फायदे