बिग बॉस मध्ये हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे. मात्र वाद व भांडणांच्या दरम्यान साउथ अभिनेत्री श्रुतिका अर्जुन आपल्या अंदाजाने चाहत्यांचे मनोरंजन करत असते.
श्रुतिका आपल्या वडिलांनी आयुष्यात केलेला त्याग आणि संघर्षाची आठवण काढून भावूक झाली होती.
श्रुतिका म्हणाली की, मी आई-वडिलांना खूप मिस करत आहे. अजूनपर्यंत मी त्यांच्याशिवाय राहिले नाही.
पापा इतके श्रीमंत नाहीत, जितके अर्जुन (श्रुतिकाचा पती) आहे. माझ्या लग्नात वडिलांनी आयुष्यभराची कमाई खर्च केली.
वडिलांच्या आठवणीत श्रुतिका खूप रडत होती. तिने सांगितले की, भावाने एकदाही वडिलांना विचारले नाही की, माझ्यासाठी काय ठेवलंय.
श्रुतिकाने पुढे सांगितले की, तिच्या लग्नासाठी वडिलांनी जे कर्ज घेतले होते, ते इतक्या वर्षानंतरही फेडत आहेत.
श्रुतिका म्हणाली की, तिला तिच्या वडिलांसाठी एक घर खरेदी करायचं आहे.
अभिनेत्रीने सांगितले की, तिच्या आईला फिरण्याची खूप आवड आहे. यामुळे तिला आपल्या आईला घेऊन वर्ल्ड टूर वर जायचं आहे.
श्रुतिका अर्जुन सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असून ती नेहमीच तिचे सुंदर फोटो शेअर करत असते.