भुवनेश्वर कुमार आज महारेकॉर्ड करणार?

By Rohit Bibhishan Jetnavare
Mar 23, 2024

Hindustan Times
Marathi

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आयपीएलमध्ये सनरायजर्स हैदराबादकडून खेळतो.

भुवी २०१४ पासून सनरायजर्स हैदराबादकडून खेळत आहे. पण आता यंदाच्या आयपीएलमध्ये भुवी एक खास विक्रम आपल्या नावावर करणार आहे.

आयपीएल २०२४ चा तिसरा सामना (२३ मार्च) कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे.

या सामन्यात भुवनेश्वर कुमार एक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर करू शकतो, जो आजपर्यंत कोणत्याही भारतीय खेळाडूला करता आलेला नाही.

केकेआरविरुद्धच्या सामन्यात भुवीने ४ विकेट घेतल्या तर तो एकाच संघाकडून १५० आयपीएल विकेट घेणारा गोलंदाज ठरेल.

भुवीने आतापर्यंत SRH साठी १२९ सामन्यात १४६ विकेट्स घेतल्या आहेत. ४ विकेट घेतल्यानंतर तो SRH साठी IPL मध्ये १५० विकेट पूर्ण करेल.

त्याच्याआधी सुनील नरेन आणि लसिथ मलिंगा यांनी एका संघाकडून १५० हून अधिक विकेट घेतल्या आहेत.

सुनील नारायणने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत केकेआरकडून खेळताना आतापर्यंत १६३ विकेट घेतल्या आहेत. 

तर लसिथ मलिंगाने मुंबई इंडियन्सकडून खेळताना १७० विकेट घेतल्या आहेत.

भुवनेश्वर कुमारने आतापर्यंतच्या IPL कारकिर्दीत १६० सामने खेळून १७० विकेट्स घेतल्या आहेत.  

टीआरपीमध्ये कोणत्या मालिका ठरल्या ‘टॉप १०’?