हळदीचे उपाय

By Rohit Bibhishan Jetnavare
Feb 09, 2024

Hindustan Times
Marathi

सनातन परंपरेत हळदीला खूप शुभ मानले जाते. त्यामुळे हळदीला धार्मिक, ज्योतिष आणि आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून अत्यंत फायदेशीर मानले जाते. 

हळद हे केवळ आरोग्यासाठीच चांगले नाही, तर सर्व अडथळ्यांपासून आपले रक्षण करते. 

दर गुरुवारी गणपतीला चिमूटभर हळद अर्पण केल्यास विवाहाच्या आड येणाऱ्या अडचणी दूर होतात.

वास्तूशास्त्रानुसार, किचनमध्ये हळदीची गाठ ठेवणे खूप शुभ मानले जाते. हे ठेवल्याने कधीही पैशाची कमतरता भासत नाही.

वास्तूशास्त्रानुसार, घराच्या मेन दरवाजात हळदीची गाठ बांधल्याने घरात सुख समृद्धी येते.

देवघरात हळदीची गाठ ठेवणे, शुभ मानले जाते. असे केल्याने घरात सुख समृद्धी येते.

वास्तूशास्त्रानुसार, पैशांचा आणि धनाचा प्रवाह वाढवण्यासाठी घरातील तिजोरीत हळदीची गाठ ठेवावी. त्यामुळे माता लक्ष्मीची कृपा होते.  

हाडे मजबूत करणारे पदार्थ