कच्चा कांदा खाण्याचे फायदे

Pexels

By Hiral Shriram Gawande
Jun 28, 2024

Hindustan Times
Marathi

कच्चा कांदा खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती, पचनशक्ती, रक्तातील साखर नियंत्रण, त्वचेचे आरोग्य असे विविध फायदे मिळू शकतात.

Pexels

उन्हाळ्यात उष्णतेच्या लाटेपासून वाचण्यासाठी कच्चा कांदा खाण्याचा सल्ला दिला जातो. जाणून घ्या कच्चा कांदा खाण्याचे फायदे.

Pexels

कांद्यामध्ये व्हिटॅमिन सी, बी६, फोलेट आणि पोटॅशियम सारख्या आवश्यक पोषक तत्वांचा समावेश असतो. अँटी इंफ्लेमेटरी संयुगे, अँटी-एलर्जी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध कांदे उष्णतेमुळे होणारी जळजळ आणि अस्वस्थता कमी करते.

Pexels

कांदे पचन सुधारतात आणि आतड्यांचे आरोग्य सुधारतात. सलाद मध्ये किंवा लिंबाच्या रसासोबत कच्चा कांदा खाल्ल्याने पचन आणि पोटाशी संबंधित समस्या दूर होतात.

Pexels

अँटिऑक्सिडंट, अँटीकार्सिनोजेनिक गुणधर्म औषधासारखे कार्य करतात. सेलेनियम रोगप्रतिकार शक्ती देखील वाढवते. यामध्ये असलेले व्हिटॅमिन शरीरातील संसर्ग आणि रोगांशी लढते. 

Pexels

यात सल्फर आणि क्वेर्सेटिन सारखी मधुमेहविरोधी संयुगे असतात जी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करतात

Pexels

व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्मांमुळे त्वचेचे आरोग्य राखते. सुरकुत्या कमी करते आणि त्वचेची चमक टिकवून ठेवते. कांदा विषारी पदार्थ काढून त्वचेला आतून स्वच्छ करण्यास मदत करतो

Pexels

सैफ अली खान डिस्चार्जनंतर फिट अँड फाईन, नवाबासारखी एंट्री