By Hiral Shriram Gawande
May 22, 2024

Hindustan Times
Marathi

कोरफड ही एक अशी वनस्पती आहे जी प्रत्येकाच्या घरात वाढवता येते. जाणून घ्या रोज कोरफडचा रस पिण्याचे फायदे.

यात भरपूर जीवनसत्त्वे, एन्झाईम्स, खनिजे आणि पोषक घटक असतात. हे शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. शरीरातील कचरा काढून टाकते. किडनी आणि लिव्हरला चांगले कार्य करण्यास मदत करते. व्यायामानंतर कोरफडचा रस प्यायल्याने शरीराला व्यायामामुळे गमावलेले पाणी भरून काढण्यास मदत होते.

Pexels

यातील व्हिटॅमिन बी मेंदूच्या आरोग्यासाठी चांगले आहे. व्हिटॅमिन सी रोगप्रतिकार शक्ती राखते. फॉलिक ॲसिडमुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. व्हिटॅमिन ई शरीराला कर्करोगापासून वाचवते. 

Pexels

कोरफडच्या रसातील अल्कधर्मी पदार्थ छातीत जळजळ कमी करतात. हे पोटातील अॅसिडचा स्राव नियंत्रित करतात. त्यामुळे पोटफुगी दूर होते. अल्सर बरे करतो. 

Pexels

कोरफडच्या रसामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. हे शरीरातील फ्री रॅडिकल्स काढून टाकण्यास मदत करते. हे यकृत, मूत्रपिंड, मूत्राशय आणि प्लीहा स्वच्छ करण्यास मदत करते. यामुळे तुमच्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढते.

Pexels

गरोदरपणात टाळा हे पदार्थ