कच्चे दूध चेहऱ्यावर लावण्याचे फायदे

By Hiral Shriram Gawande
Jun 11, 2024

Hindustan Times
Marathi

दुधात अनेक पोषक घटक असतात. यामध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे हाडांच्या आरोग्यासाठी उत्तम.

दूध चेहऱ्यालाही लावता येते. रात्री झोपण्यापूर्वी कच्चे दूध लावल्याने अनेक फायदे होतात.

झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर कच्चे दूध लावल्याने रंग सुधारतो

कच्च्या दुधात कॉटन बॉल बुडवा आणि रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावा. यामुळे त्वचा चमकदार होईल.

त्वचा कोरडी असेल तर कच्चे दूध चांगले. मॉइश्चरायझर म्हणून ते चेहरा ओलसर ठेवते.

कच्च्या दुधात हळद मिसळून लावल्यास मुरुम दूर होतात.

मुलतानी माती कच्च्या दुधात मिसळून चेहऱ्यावर लावल्यास टॅनिंगपासून आराम मिळतो.

थोडे बेसन दुधात मिसळून चेहऱ्यावर २-३ मिनिटे मसाज करा. हा फेस स्क्रब मृत त्वचा काढून टाकतो.

कच्चे दूध थेट चेहऱ्यावर लावता येते. हे थेट कापूस किंवा हाताने लावू शकतो.

कच्चे दूध वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करा. त्वचा सेंसेटिव्ह असल्यास एलर्जी होण्याची शक्यता असते. 

जूनचा हा आठवडा या राशींसाठी लकी