चमकदार त्वचेसाठी केळी कॉफी फेस मास्क

freepik

By Hiral Shriram Gawande
Oct 03, 2024

Hindustan Times
Marathi

प्रत्येकाला सुंदर त्वचा हवी असते. यासाठी विविध उपाय केले जातात. केळी आणि कॉफी फेस मास्क त्वचा उजळ करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.

freepik

सुंदर त्वचा मिळविण्यासाठी महागड्या प्रोडक्टऐवजी घरगुती उपचार प्रभावी आहेत. केळी कॉफी फेस पॅक लावल्याने त्वचेच्या समस्या दूर होतात.

freepik

हा फेस मास्क तयार करण्यासाठी एक पिकलेले केळ, एलोवेरा जेल, मध आणि कॉफी पावडर घ्या.

freepik

प्रथम, केळी चांगले मॅश करा आणि त्यात एलोवेरा जेल, मध आणि कॉफी पावडर मिक्स करा.

हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि काही वेळाने पाण्याने धुवा.

freepik

त्वचा चमकदार, स्मूथ आणि हायड्रेटेड होण्यासाठी हे उपयुक्त आहे. हे काळे डाग दूर करण्यासाठी देखील चांगले आहे.

freepik

टीप: हा फेस मास्क चेहऱ्यावर लावण्यापूर्वी पॅच टेस्ट करावी. जर तुम्हाला संवेदनशील त्वचा किंवा एलर्जी असेल, तर त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे चांगले.

freepik

मखाना खाण्याचे काय आहेत फायदे?