बाळासाहेब ठाकरेंमुळे वाचला ‘या’ अभिनेत्रीचा जीव!

By Harshada Bhirvandekar
Apr 08, 2024

Hindustan Times
Marathi

अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांनी आपल्या दमदार अभिनयाने नेहमीच सगळ्यांचे मनोरंजन केले आहे. 

त्यांनी कॉमेडी रियॅलिटी शो ‘फु बाई फु’मधून आपल्या विनोदी अभिनयाचा दर्शन देखील सगळ्यांना घडवले.

‘फु बाई फु’ या विनोदी कार्यक्रमात त्यांनी अनेक वेगवेगळ्या प्रकारची पात्र साकारली. 

यात त्यांनी कधी खलनायिका साकारली, तर कधी प्रेमळ आई... इतकंच नाही तर त्यांनी स्टँड अप कॉमेडीमध्ये देखील नशिबात आजमावलं. 

या सगळ्या प्रवासात सुप्रिया पाठारे यांच्याबरोबर एक धक्कादायक प्रसंग देखील घडला होता.  

एका चित्रपटाचे शूटिंग राजस्थानमध्ये सुरू होते. या चित्रपटात सुप्रिया पाठारे देखील एक लहानशी भूमिका करणार होत्या. 

मात्र, राजस्थानला गेल्यावर त्या चित्रपटाच्या निर्मात्याने सुप्रिया पाठारे यांना तब्बल तीन महिने बंदी बनवून ठेवलं होतं.  

त्यावेळी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी सुप्रिया पाठारे यांना वाचवण्यासाठी मदत केली होती. 

आजही हा किस्सा सांगताना सुप्रिया पाठारे यांच्या अंगावर शहारे येतात. बाळासाहेब ठाकरे यांच्या फोनमुळेच त्यांचा जीव वाचला.

गरोदर महिलांनी आपल्या आहाराबाबत खूप काळजी घेणे आवश्यक आहे. या काळात भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने त्यांना अनेक फायदे होतात.

गरोदर महिलांसाठी भोपळ्याच्या बिया खूप फायदेशीर!

Unsplash