बाळासाहेब ठाकरे नावाचा झंझावात

By Ganesh Pandurang Kadam
Jan 23, 2024

Hindustan Times
Marathi

महाराष्ट्राचं समाजकारण व राजकारणावर अमीट छाप सोडणारे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती

मराठी माणसावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी १९६६ साली बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली.

पेशानं व्यंगचित्रकार असलेल्या बाळासाहेबांनी तहहयात शिवसेनेचं निर्विवाद नेतृत्व केलं.

बाळासाहेबांच्या नेतृत्वाला त्यांच्या हयातीत कोणीही आव्हान देऊ शकलं नाही. 

बाळासाहेब ठाकरे नावाच्या व्यक्तिमत्त्वाचा दरारा व वर्त्कृत्वाची जादूच तशी होती.

तळागाळातील सामान्य माणसाला बाळासाहेबांनी नवी ओळख मिळवून दिली.

बाळासाहेबांमुळं अनेक जण यशाच्या व प्रसिद्धीच्या शिखरावर जाऊन बसले.

बाळासाहेबांनी घेतलेल्या बेधडक भूमिकांची राज्यातच नव्हे, देशात व जगातही चर्चा झाली.

बाळासाहेबांना मराठी माणसाचं जितकं प्रेम मिळालं, तितकेच देशातील हिंदूंनाही ते आपले वाटले.

बाळासाहेबांचे अनेक निर्णय वादग्रस्त ठरले, त्यांच्यावर टीका झाली. पण त्यांनी कधी पर्वा केली नाही.

आजही त्यांचं नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्राचं राजकारण चालत नाही, यातच सगळं आलं.

अशा या उत्तुंग नेतृत्वाला विनम्र अभिवादन

बिना तेलाची 'क्रीमी दाल मखनी' कशी बनवायची?