अयोध्येतील राम मंदिरात श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा झाली आहे. श्रीरामाची बाळ स्वरूपातील मूर्ती गर्भगृहात स्थापन करण्यात आली.
अनेकांना प्रश्न पडला की, श्रीरामाची मूर्ती काळ्याच रंगाची का आहे, जाणून घ्या याचे कारण.
वाल्मीकी रामायणात भगवान रामाचे श्यामल रूपाचे वर्णन केले आहे.
भगवान रामाच्या स्तुती मंत्रात म्हटले आहे की- नीलाम्बुज श्यामल कोमलांगम सीतासमारोपित वामभागम्| पाणौ महासायकचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथम्|
अर्थ - निळ्या कमळासारखे गडद, सुंदर आणि कोमल अंग असलेले. ज्यांच्या डाव्या बाजूला सीता माता आहे, व ज्यांच्या हातातील अतुलनीय धनुष्य बाण प्रतिमेला आणखी आकर्षीत करतात. त्या रघू कुळातील श्रीरामास वंदन.
तसेच रामाची ही मूर्ती शालीग्राम, श्याम शिला या दगडाने तयार करण्यात आली आहे.
या दगडाचे वैशिष्ट्य म्हणजे हजार वर्षांहून अधिक काळ मूर्ती तशीच राहू शकते. पाणी, कुंकू, चंदन व दूध या कोणत्याच गोष्टींचा मूर्तीवर परिणाम होणार नाही.
शर्वरी वाघच्या लेहंग्यात किंमत ऐकून डोळे विस्फारतील!